पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

स्वतंत्र वापरा

पार्किंगमधील दुचाकीच्या डिकीतून
पळविली ७० हजारांची रोकड

कोल्हापूर, ता. २८ ः बॅंकेत धनादेश वटविण्यासाठी गेल्यानंतर पार्किंगमधील दुचाकीच्या डिकीतून ७० हजारांची रोकड पळविली.
शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात एका बँकेसमोर ही घटना घडली. काल दुपारी अडीचच्या सुमारास पाच-दहा मिनिटांत हा प्रकार घडल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. याची फिर्याद दिवाणजी संदीप शंकर नलवडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी आणि फिर्याद यांनी सांगितले, की शाहूपुरीत एका ट्रेडिंग कंपनीत काम करणारे दिवाणजी संदीप नलवडे हे सोमवारी दुपारी मार्केट यार्ड येथील कंपनीतून पैसे घेवून एका शाहूपुरीतील एका बॅंकेत भरण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे असलेले ७० हजार रुपये त्यांनी मोपेडच्या डिकीत ठेवले होते. शाहूपुरीतील बॅंकेत जाण्यापूर्वी सोबत असलेले दोन धनादेश वटविणयासाठी शाहूपुरीतील पाच बंगला परिसरातील बॅंकेत गेले. यावेळी त्यांची मोपेड बँकेच्या बाहेर उभा केली होती. बॅंकेत धनादेश देवून पुन्हा मोपेडजवळ आल्यानंतर शीट उघडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी डिकीतील पैसे पाहिले असता ते पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची फिर्याद दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
---
स्वतंत्र वापरा

मोटारची काच फोडून चोरट्याने
पळविले दोन लॅपटॉप, रक्कम

कोल्हापूर, ता. २८ - राजारामपुरीत एका हॉटेलसमोर उभा केलेल्या मोटारची काच फोडून चोरट्याने दोन लॅपटॉपसह रोख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. दोन दिवसापूर्वी रात्री नऊ ते साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी सुंदरराज रविकुमार हे कदमवाडीत राहतात. रविवारी रात्री त्यांनी राजारामपुरी येथील दुसऱ्या गल्लीत एका हॉटेलसमोर त्यांनी त्याची मोटार उभी केली होती. अज्ञाताने त्यांच्या मोटारीची डाव्या बाजूची काच फोडली. त्यातून दोन लॅपटॉपसह दोन डायऱ्या साडेसात हजार रुपये रोख असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे. हा प्रकार सराईत चोरट्याने केला आहे, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
--------------
सं पट्यात चालेल
विहिरीतील मोटर काढताना जखमी झालेल्याचा मृत्यू
कोल्हापूर ः विहिरीतील मोटर काढताना काठावरील दगड डोक्यात पडून गंभीर जखमी झालेले जखमीचा ‘सीपीआर’मध्ये आज मृत्यू झाला. लगमाप्पा मार्तंड पाटील (वय ४०, रा. नुंगुळ, ता. जमखंडी, जि. बागलकोट) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
पोलिसांनी सांगितले, की पाटील हे जखमी झाल्यानंतर त्यांना १५ मार्चला मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नातेवाईकांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.