अर्ज छाननी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्ज छाननी
अर्ज छाननी

अर्ज छाननी

sakal_logo
By

दहा अर्ज झाले अपात्र;
२६ अर्जांवर निकाल आज

कोल्हापूर, ता. २८ : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी दाखल झालेल्या २३७ उमेदवारी अर्जांपैकी ३३ अर्जांवर हकरती घेण्यात आल्या. यापैकी दहा उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. तर, २३ उमेदवारी अर्जांवरील हकरतीमध्ये पात्र-अपात्र ठरलेल्या उमदेवारांचा निकाल उद्या (ता. २८) सकाळी ११ पर्यंत कारखान्याच्या नोटीस बोर्डवर आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी आज दिली. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर उद्यापासून अर्ज माघार घेतली जाणार आहे.
करे म्हणाले, ‘राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये साखर कारखान्याच्या करारानूसार ऊस पुरवठा झालेला नाही. सूचक, अनुमोदक हे कोणत्या तरी संस्थेच थकबाकीदार आहेत, असे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. ही छाननी तीन टप्प्यात घेण्यात आली. यामध्ये ४ उमेदवारी अर्जामध्ये उमेदवार, सुचक व अनुमोदक यांनी अपेक्षित ऊस पुरवठा केलेला नाही. तसेच थकीत कर्जदार आहेत. त्यामुळे चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र, याची अधिकृत घोषणा उद्याच केली जाणार आहे.

चौकट
आज अपात्र झालेले उमेदवार
गट क्रमांक एक, तीन, पाच मध्ये प्रत्येकी १ असे, गट क्रमांक सहा मध्ये ६ व इतर मागासमधून १ असे एकूण १० उमदेवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. एका उमेवाराने संस्था गटाचा ठराव असताना त्यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज या गटातून अपात्र ठरविण्यात आला आहे.