Sun, June 4, 2023

नुतन मुतगी
नुतन मुतगी
Published on : 28 March 2023, 5:17 am
कलाप्पा मुतगी यांना घरफाळ्याची नोटीस
कोल्हापूर ः टेंबलाईवाडी येथील प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्थेतील खुल्या जागेच्या घरफाळ्याची नोटीस कलाप्पा महारुद्राप्पा मुतगी यांच्या नावाने घरफाळा विभागाने काढली आहे. त्यात माजी नगरसेविका नुतन मुतगी यांचा नावाचा उल्लेख नाही. ती नोटीस नुतन मुतगी यांना काढल्याचे अनावधानाने प्रसिद्ध झाले आहे. त्या जागेवरील अतिक्रमणाबाबतचे प्रकरण विभागीय कार्यालय क्रमांक तीनने निकाली काढले आहे. खुल्या जागेबाबतची करआकारणीची नोटीस घरफाळा विभागाने कलाप्पा मुतगी यांना दिली आहे. त्या जागेवरील अतिक्रमण काढून घेतले असून तिथे महापालिकेने संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. अतिक्रमण दिसत नसल्याने प्रकरण निकाली काढल्याचे पत्र विभागीय कार्यालयाने शांताबाई कलाप्पा मुतगी यांना दिले आहे.