स्थानिक कामगारांना प्राधान्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक कामगारांना प्राधान्याची मागणी
स्थानिक कामगारांना प्राधान्याची मागणी

स्थानिक कामगारांना प्राधान्याची मागणी

sakal_logo
By

ich291.jpg
92096
इचलकरंजी : मराठी कामगार सेनेतर्फे कामगार अधिकारी विजय तोडकर यांना निवेदन देण्यात आले.

स्थानिक कामगारांना प्राधान्याची मागणी
इचलकरंजी : इचलकरंजी व कोल्हापूर शहरात गारमेंट, फौंड्री उद्योग, तसेच विविध उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. मात्र येथे परप्रांतीय कामगारांचा भरणा दिसून येतो. परिणामी स्थानिक युवकांना बेरोजगारी सहन करावी लागत आहे. त्यामुळे येथील उद्योगांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळावे, या मागणीचे निवेदन मराठी कामगार सेनेतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कामगार अधिकारी विजय तोडकर यांच्याकडे दिले. मराठी कामगार सेना तालुकाध्यक्ष महेश शेंडे, योगेश दाभोळकर, अमित पाल, दीपक पवार, रोहित काटकर, किरण माळी, राहुल दवडते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.