
राजाराम कारखाना सतेज
92256
वैध उमेदवार अवैध केल्याने
सहकारातील काळा दिवस
आमदार सतेज पाटील
कोल्हापूर, ता. २८ : महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करत सत्ताधाऱ्यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी इच्छुक असणाऱ्या वैध उमेदवारांना अवैध करण्याचे काम केले आहे. त्यामुळे सहकारातील हा काळा दिवस ठरला आहे. याशिवाय, राज्यात सहकाराचा इतिहास लिहिताना निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांचे नाव काळ्या शाहीने नोंदवले जाईल, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी आज केली.
आमदार पाटील यांच्या गटाचे तब्बल २९ उमेदवार छाननीमध्ये अवैध ठरले. यामुळे निवडणूक निणर्य अधिकारी करे यांनी याची यादी प्रसिध्द करताच आमदार सतेज पाटील समर्थक आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांनी आमदार महादेवराव महाडिक आणि निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांचा निषेध केला. त्यानंतर अजिंक्यतारा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर महाडिक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याविरुध्द निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.
आमदार पाटील म्हणाले, गोकुळमध्ये महाडिक यांनी स्वत:च्या घरातले संचालक केले. त्यांची ऐवढी हिंम्मत असेल तर राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत घरातील उमदेवारांचे अर्ज मागे घेवून इतरांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. महाडिक यांनी निवडणुकीची कुस्ती लढवण्याआधीच मैदानातून पळ काढला आहे. मी स्वत:साठी लढलो नाही. गोकुळमध्ये संचालक झालो नाही. महाडिक यांनी मात्र घरातले संचालक केले. सभासद ज्यांना कौल देतील तो आम्हाला मान्य राहिल. मात्र, निवडणूक लढण्याआधीच महाडिक यांनी मैदानातून पळ काढला आहे. उमदेवार अपात्र करुन रडीचा डाव खेळला आहे. महादेवराव महाडिक यांनी कारखान्याचा चांगला कारभार केला असेल तर त्यांनी मैदानात आले पाहिजे होते. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अर्ज अैवध ठरवणाऱ्या महाडिक यांना आमच्या पॅनेलचे २१ उमेवारच जागा दाखवितील. पत्ते त्यांनी डाकले असला तरी डाव मात्र आम्हीच जिंकणार आहे. त्यांनी टाकलेला पत्ता जोकर आहेत आणि आमच्या कडे १२ हजार एक्के आहेत. आता कारखान्याचा निकाल किंवा परिणामाचा विचार करणार नाही. आत्ताच लढा हा कोल्हापूरचे १२ हजार विरूध्द येलूरचे ६०० उमदेवार असाच होणार आहे.
माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, ‘राजाराम कारखान्याला करारानुसार ऊस घालूनही आपला अर्ज अवैध ठरवला आहे. ऊस तोड करत नाहीत म्हणून साखर सहसंचालकांकडे तक्रार केली. तरीही ऊस तोड केली नाही. वास्तविक कारखान्यानेच करारभंग केला आहे. स्वत: ऊस तोडून कारखान्याच्या काट्यावर नेला आणि ऊस घातला आहे. तरीही राजकीय द्वेषापोटी माझा अर्ज अवैध केला आहे. ’
बाजारीव पाटील म्हणाले (वडणगे), ‘राजाराम कारखान्याला सलग सहा वर्ष ऊस गाळप केले आहे. दरवर्षी ३० ते ४० टन ऊस जातो. पण पराभव समोर दिसल्याने आपलाही अर्ज अवैध ठरवला आहे.’ महादेव पाटील (वाशी) म्हणाले, माझ्या नावावर ४ एकर ८ गुंठे जमीन आहे. तरीहीही करार साडेचार एकराचा असल्याचे बनावट क्षेत्राची नोंद केली आहे. नियमानूसार ऊस गाळप करुनही अवैध ठरविण्याचे पाप केले आहे.’
सर्जेराव पाटील (निगवे दुमाला) म्हणाले, ‘कारखान्याला चार वर्ष ऊस गाळप करत असताना शेअर्स थकबाकी नाही. तरीही अपात्र ठरवून निवडणूकीच्चा हक्कापासून परावृत्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.’ आमदार ऋतुराज पाटील, सर्जेराव माने, बाजीराव पाटील, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, उदयानी साळुंखे उपस्थित होते.
‘महाडिक घाबरले’
लोकांमध्ये जावून निवडणूक जिंकू शकत नाही, ही खात्री पटल्याने महाडिक घाबरले आहेत. प्रतिटन दोनशे रुपये कमी दिले, मयत वारस नोंद करुन घेतलेली नाही. हेच लोकांना पटवून देण्याचे काम केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
‘चिन्ह पाहुन मतदार करा’
उमेदवार कोण आहे. त्याचं नाव काय हे पाहू नका. आपल्या पॅनेलला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावर निवडणूक जिंकायची आहे. आता आपण नाव पाहून नाही तर चिन्ह पाहुनच मतदान करुन १२ हजार सभासदांची ताकद दाखवून द्या.