अधिकाऱ्यांच्या अदलाबदलीला केवळ निकृष्ट कामाचे कारण नाही

अधिकाऱ्यांच्या अदलाबदलीला
केवळ निकृष्ट कामाचे कारण नाही

अधिकाऱ्यांच्या अदलाबदलीला
केवळ निकृष्ट कामाचे कारण नाही
संजय पवार, विजय देवणेंचे निवेदन
कोल्हापूर, ता. २९ : महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अचानक अदलाबदलीला केवळ निकृष्ट दर्जाच्या कामाचे कारण नसून अर्थपूर्ण व्यवहारांचा सूत्रधार जबाबदार आहे. स्वतःचे नुकसान होऊ नये, कारनाम्यांचे बिंग फुटू नये हे मूळ कारण असण्याची शक्यता आहे. शासनाने १६ रस्त्यांसाठी दिलेल्या १०० कोटी रूपयांच्या कामात कोणता अधिकारी अडथळा ठरू, नये याची दक्षता घेतली असल्याने प्रशासकांनी काही खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, रस्ते कामांची अंदाजपत्रके कंत्राटदाराच्या फायद्यासाठी न होता अधिकाऱ्यांकडून योग्यरित्या करावीत. त्यांची छाननी त्रयस्थ तज्ज्ञ यंत्रणेद्वारे करावी. निविदांना मोठया कंपन्यांचा प्रतिसाद मिळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. यात खासगी कामे धरलेली नाहीत ना याची खात्री प्रशासनाने करावी. रस्त्यांसाठीची यंत्रणा, साहित्यावर महापालिका, त्रयस्थ यंत्रणेने देखरेख ठेवावी. अंदाजपत्रकातून आजी-माजी लोकप्रतिनिधीच्या संबंधीत कंत्राटदाराचे हितसंबंध जपले जात आहेत का? याची खात्री करावी. रंकाळ्याला मिळालेला निधी कुठल्या कामावर कशा पध्दतीने खर्च केला जाणार आहे, यांची माहिती द्यावी. महापालिकेने ३० टक्के स्वभांडवल कोणत्या निधी अंतर्गत, कोणत्या कामासंदर्भामध्ये उपलब्ध करून दिले आहे, याची माहिती मिळावी. यापूर्वी आलेल्या निधीतील कामे काही आजी-माजी लोकप्रतिनीधींच्या दबावामुळे विशिष्ट कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर देण्यात आली. त्यांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने आंदोलने झाली. कंत्राटदाराच्या १८ टक्के विषयाची चर्चा झाली. दर्जेदार रस्ते मिळण्याचे अनेक वर्षांपासून शहरवासीयांचे स्वप्न आहे. खासदारांना रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत हे एकादिवसातच कसे काय समजले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com