टीडीआर वापर

टीडीआर वापर

पेड एफएसआय, टीडीआर समप्रमाणात
वापरण्याचा अंमल करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २९ ः एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावलीमधील तरतुदीप्रमाणे पेड एफएसआय व टीडीआर समप्रमाणात वापरण्याचा अंमल केला जावा, अशी मागणी प्रशासकांकडे केली आहे.
नवीन नियमावलीमध्ये पेड एफएसआय व टीडीआर समप्रमाणात वापरण्याची तरतूद समाविष्ट केली असून अंमलात आणण्याचा अधिकार आयुक्तांना दिला आहे. मिळकती विकसीत होताना टीडीआरची मागणी कमी झाल्याने आरक्षित मिळकती ताब्यात देण्यास मिळकतधारकांतून उदासीनता दिसून येत आहे. दोन्ही समप्रमाणात वापरल्यास महापालिकेस आर्थिक तोषीस न लागता मिळकती ताब्यात घेणे सोयीस्कर होऊ शकते. त्याचा विचार करून आदेश काढावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रल्हाद लांबोरे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com