ठाकरे गट सुधारीत

ठाकरे गट सुधारीत

फोटो क्रमांक : gad298.jpg
92271
गडहिंग्लज : बाजार समितीसाठी अर्ज दाखल करताना शिवसैनिकांना मार्गदर्शन झाले. यावेळी रियाज शमनजी, संतोष चिकोडे, सुलोचना रेडेकर, भरत जाधव उपस्थित होते.
-----------------------------------------------
ठाकरे शिवसेना ताकदीने लढणार
शिवसैनिकांचा निर्धार ; बाजार समितीसाठी अर्ज दाखल
गडहिंग्लज, ता. २९ : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा बाजार समितीवर फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी केला.
बाजार समिती निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी निर्धार केला. निवडणूक कार्यालयाजवळ बोलताना रियाज शमनजी म्हणाले, ‘जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या पुढाकाराने बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी ठाकरे शिवसेना प्रयत्नशील आहे. सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बळावर निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे. यावेळी शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी, निवडणुकीत ठाकरे शिवसेना रिंगणात उतरणार असून बिनविरोधचे प्रयत्न झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो पाळला जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, ठाकरे शिवसेनेतर्फे रियाज शमनजी यांनी सेवा सोसायटी सर्वसाधारण, ग्रामपंचायत, इतर मागासवर्ग गटातून, वसंत नाईक यांनी भटक्या विमुक्त जमाती, सुलोचना पाटील-रेडेकर यांनी महिला सर्वसाधारण, प्रकाश मुरुकटे यांनी ग्रामपंचायत सर्वसाधारण गट, भरत जाधव यांनी सेवा संस्था व ग्रामपंचायत सर्वसाधारण गट, प्रभाकर खांडेकर यांनी विकास सेवा संस्था सर्वसाधारण गटातून आज अर्ज दाखल केला. यावेळी तालुकाप्रमुख दिलीप मानेंसह शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com