कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले

sakal_logo
By

92334, 92336

इंजिनिअरिंग असोसिएशनच्या
अध्यक्षपदी दिनेश बुधले

उपाध्यक्षपदी बाबासाहेब कोंडेकर

कोल्हापूर, ता. २९ ः येथील कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या विश्वस्त मंडळाची सभा झाली. त्यामध्ये सन २०२३-२४ या कालावधीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी बाबासाहेब कोंडेकर, सचिवपदी प्रसन्न तेरदाळकर यांची निवड झाली. खजिनदारपदी कमलाकांत कुलकर्णी यांची सर्वानुमते सलग २४ व्या वर्षी फेरनिवड केली.
विश्‍वस्त सचिन मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा झाली. त्यात स्वीकृत संचालकपदी जयदिप मांगोरे, सोहन शिरगावकर यांची, तर कोल्हापूर उद्यमवार्ताच्या मुख्य संपादकपदी विश्वस्त नितीन वाडीकर यांची फेरनिवड झाली. माजी अध्यक्ष हर्षद दलाल यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. संजय अंगडी, अतुल आरवाडे, अमर करांडे, अभिषेक सावेकर, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते. दरम्यान, नूतन अध्यक्ष बुधले १९ वर्षांपासून असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी २००७-०८ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सध्या कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. सभासद उद्योजकांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे बुधले यांनी सांगितले.