भारतीय कम्युनिस्ट पक्ष निवेदन

भारतीय कम्युनिस्ट पक्ष निवेदन

92276

सरकारी तपासणी नाके
खासगी कंपन्यांना विकू नका

जिल्हा प्रशासनाला ‘भाकप’तर्फे निवेदन

कोल्हापूर, ता. २९ ः परिवहन विभागाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांची बांधा, वापरा व हस्तांतरीत करा, या तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ही योजना राबवत आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीशी २४ वर्षे सहा महिन्यांसाठी सवलत करार केलेला आहे. मात्र, सरकारी तपासणी नाके खासगी कंपन्यांना विकू नका, अशा मागणीचे निवेदन ‘भाकप’तर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
करारानुसार या कंपनीला वाहन चालक मालकांकडून सेवा प्रक्रिया शुल्क त्यावरील सेवा कर, उपकर वसुलीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा या तपासणी नाक्यांवरील अधिकार संपुष्टात येणार आहे. खासगी कंपन्या या फक्त नफा कमवण्याच्या उद्देशाने येणार आहेत. याबाबतचा अनुभव राज्यातील तसेच अनेक राज्यातील पिळवणुकीचाच आहे.हे खासगीकरण सरकारने ताबडतोब थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सतीशचंद्र कांबळे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, सादिक मुल्ला, उत्कर्ष पवार, इर्शाद फरास, रियाज मुजावर, जावेद बागवान आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com