
जवाहर नवोदय
92355
नवोदय विद्यालयात ‘विज्ञान ज्योती’
कागल : येथील जवाहर नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती कार्यक्रम झाला. विज्ञानात रुची वाढविण्यासाठी संशोधनासाठी निवड झालेल्या मुलींना विज्ञान संशोधन किट देण्यात आले. प्रतिभाशाली मुलींमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होण्यासाठी विज्ञान ज्योती कार्यक्रम जवाहर नवोदय विद्यालयात होतो. दरवर्षी ९ वी ते १२ वीत शिकणाऱ्या मुलींमधून ५०-५० प्रतिभाशाली मुलींची निवड होते. या विद्यालयाव्यतिरिक्त आसपासच्या शाळेतील विद्यार्थीनींचाही समावेश आहे. कार्यक्रमाअंतर्गत १२ वीच्या विद्यार्थीनींना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधनासाठी निवड झालेल्या मुलींना संशोधन किट दिले जातात. याव्यतिरिक्त जेईई व नीट परीक्षेसाठी एलन व आकाश कोचिंग क्लासचे स्टडी मटेरियल दिले जाते. सायन्स लॅब, मेडिकल कॉलेज इ. भेटी घडवल्या जातात. को-आॅर्डिनेटर सौरभकुमार चौधरी, पीजीटी जीवशास्त्र व विद्यालयाचे प्राचार्य रवी दामोदर यांचे सहकार्य लाभत आहे.