पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

gad305.jpg
92427
गडहिंग्लज : येथील ‘एमआर’ हायस्कुलच्या १९६६ ते १९७५ मधील विद्यार्थ्यांचा मेळावा झाला.
-----------------------

पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा
''एमआर'' माजी विद्यार्थी मेळावा; प्रशालेच्या गतवैभवासाठी मदतीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील जिल्हा परिषदेच्या महाराणी राधाबाई हायस्कुलने (एमआर) आम्हाला घडवले. या प्रशालेतील संस्कारामुळेच जीवनाच्या या लढाईत यशस्वी होऊ शकलो. या कृतज्ञतेच्या भावनेमुळेच प्रशालेच्या गतवैभवासाठी मदतीची ग्वाही १९६६ ते १९७५ तुकडीतील विद्यार्थ्यांनी दिली. निमित्त होते एमआरच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. मेळाव्यात पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य संजय कुंभार अध्यक्षस्थानी होते.
माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष चद्रकांत गुरव यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या नियोजनाची माहिती दिली. डॉ. सुरेश संकेश्र्वरी, सुभाष हत्ती, सदानंद सुभेदार, अशोक देशपांडे, दौलत सावंत यांनी भाषणात ''एमआर''मधील आठवणींना उजाळा दिला. १९५१ चे माजी विद्यार्थी विठ्ठल सुतार यांचा गौरव केला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या आवाराचा फेरफटका मारला. तत्कालिन वर्गामध्ये जाऊन पूर्वीच्या आठवणी जाग्या केल्या. डॉ धाकोजी, जयवंत देसाई, महादेवी कोल्हापूरे, मंदा पाटील, शीला गिंडे, उषा खडके, जयश्री हिरेमठ आदी उपस्थित होते. प्राचार्य कुंभार यांनी प्रशालेची सद्य स्थितीची माहिती दिली. सचिव संकेत देसाई यांनी आभार मानले. उपाध्यक्ष माधव पाटील यांनी सुत्रसंचलन केले.
-------------
''एमआर''साठी काहीपण
एमआरमधील शिक्षकांनी शिकवलेल्या आर्दशावरच वाटचाल सुरु असल्याचे अनेकांनी मनोगतात सांगितले. पार्श्वभुमी नसताना उद्योगाचा डोंगर केवळ ‘एमआर’च्या शिकवणुकीवरच उभारल्याचे माजी विद्यार्थी, जेष्ठ उद्योजक मोहन थिटे यांनी सांगितले. परिणामी, ‘एमआर’साठी काहींपण करायची तयारी असल्याचे थिटेनीं आवर्जून नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com