
डिजीटल पेमेंटविषयी जागरूक होणे आवश्यक
डिजीटल पेमेंटविषयी जागरूक होणे आवश्यक
राजू झेले; इचलकरंजीतील कन्या महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा
जयसिंगपूर, ता. ३१ः येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय व कामर्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पेमेंटविषयी जागरूकता आणि आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली.
उद्घाटक म्हणून शाळा समिती सदस्य राजू झेले यांनी डिजिटल पेमेंटविषयी जागरूकता होणे ही काळाची गरज आहे व डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची खबरदारी सर्वांनी घेण्याविषयी आवाहन केले. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून देवचंद कॉलेज निपाणीचे प्रा. डॉ.राहुल म्होपरे व एन. डी. पाटील नाईट कॅालेजचे प्राचार्य डॉ. भरत पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रथम सत्रामध्ये प्रा. डॉ.राहुल म्होपरे यांनी डिजीटल पेमेंटची साधने’ या विषयावर मार्गदर्शन केले. डिजिटल बॅंकिंग क्षेत्रातील वेगवेगळया अॅपची माहिती देत असताना उदाहरणांद्वारे समजावून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. डिजिटल पेमेंट अॅपमधील आपली चूक होते. शक्यतो अॅपची सिक्युरिटी असते असे सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये एन. डी. पाटील नाईट कॅालेजचे प्राचार्य डॉ. भरत पाटील डिजिटल पेमेंट जागरूकता आणि आव्हाने’ याविषयी बोलताना येणाऱ्या काळात अमुलाग्र बदलाविषयी सजग होणे आवश्यक आहे. पेमेंट कार्डचे प्रकार डेबिट बॅंकिंग, बिटकॉईन व रॅन कॉईन यासारख्या चलनाची माहिती दिली. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी.बी.कर्णिक यांनी डिजिटल पेमेंटविषयी विद्यार्थिनींनी घ्यावयाची काळजीविषयी मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. माधुरी शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी करून दिला. आभार प्रा. बी. एस. पाटील यांनी केले. दुसऱ्या सत्राचे स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पद्मजा पाटील यांनी करून दिला व आभार प्रा. डॉ. पी. डी. चंदनशिवे यांनी मानले. दोन्ही सत्राच्या प्रश्नोत्तरामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. भरत पाटील यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वितरण केले.