गडहिंग्लजला ई-रिक्षाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला ई-रिक्षाचे लोकार्पण
गडहिंग्लजला ई-रिक्षाचे लोकार्पण

गडहिंग्लजला ई-रिक्षाचे लोकार्पण

sakal_logo
By

gad3010.jpg
92488
गडहिंग्लज : ई-रिक्षाचे लोकार्पण करताना डॉ. प्रकाश गुणे व अनुराधा गुणे. शेजारी महेश उर्फ बंटी कोरी, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, स्वाती कोरी आदी. (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज)
-----------------------------
गडहिंग्लजला ई-रिक्षाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : येथील नगरपालिकेत ई-रिक्षा लोकार्पण कार्यक्रम झाला. स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हा कार्यक्रम झाला. डॉ. प्रकाश गुणे यांनी सीएसआर फंडातून शहरासाठी ही ई-रिक्षा दिली आहे. डॉ. गुणे व अनुराधा गुणे यांच्याहस्ते ई-रिक्षाचे लोकार्पण झाले.
शहरासाठी ई-रिक्षा दिल्याबद्दल डॉ. गुणे व सौ. गुणे यांचा सत्कार केला. उत्कृष्ट काम करणाऱ्या वंदना माने, रुपा सावरे, स्नेहल म्हेत्री, अलका परमार, रुपा म्हेत्री, दीपा वाघेला या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. जल अभियंता अनिल गंदमवाड यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, सुनिता पाटील, नाज खलिफा, वीणा कापसे, शकुंतला हातरोटे, सागर पाटील, किरण कापसे आदी उपस्थित होते.