Sun, May 28, 2023

-
-
Published on : 30 March 2023, 2:20 am
‘गोकुळ’तर्फे औषधी
वनस्पतींची लागवड
राज्याचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा (गोकुळ) दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सत्तर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आमदार मुश्रीफ यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान असल्याचे या वेळी ते म्हणाले. या वेळी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, यु. व्ही. मोगले, बी. आर. पाटील, डॉ. पी. जे. साळुंके, डॉ. प्रकाश दळवी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.