वृत्तपत्र विक्रेता

वृत्तपत्र विक्रेता

92553
महालक्ष्मी दिनदर्शिकेत
वृत्तपत्र विक्रेता दिनाची नोंद करा
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी
कोल्हापूर, ता. ३० ः महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या महालक्ष्मी दिनदर्शिकेत पंधरा ऑक्टोबर या दिवशी वृत्तपत्र विक्रेता दिनाची नोंद करावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने महालक्ष्मी दिनदर्शिका व्यवस्थापनाकडे करण्यात आली. महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते व पदाधिकाऱ्यांनी महालक्ष्मी दिनदर्शिका व्यवस्थापक कपिल जांभळे यांच्याकडे पत्र दिले. राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे आदी पदाधिकाऱ्यांच्या त्यावर सह्या आहेत.
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने २०१८ पासून भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचा उल्लेख दिनदर्शिकेत व्हावा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे धनंजय शिराळकर, राजाराम पाटील, सुरेश ब्रह्मपुरे, महेश घोडके व परशराम सावंत यांच्यासह महालक्ष्मी दिनदर्शिकेचे संजय घोसाळकर, विक्रम भोसले व विनायक देवणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com