
संक्षिप्त
महाबँक रिटायरिज असोसिएशनचे अधिवेशन
कोल्हापूर : महाबँक रिटायरिज असोसिएशन संघटनेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन हॉटेल अयोध्या येथे झाले. अधिवेशनास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, बेळगाव, गोवा येथील तीनशेहून अधिक सभासद उपस्थित होते. ऑल इंडिया बँक रिटायरिज फेडरेशनचे अध्यक्ष एस. एम. देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उपाध्यक्ष सुहास देशपांडे अध्यक्षस्थानी होते. श्री. देशपांडे यांनी राष्ट्रीय पातळीवर बँक निवृत्तांचे असलेल्या प्रश्नांची सध्याची स्थिती सांगितली. सुहास देशपांडे यांनी निवृत्तीनंतरही आपल्या मातृसंस्थेला सर्वतोपरी साह्य करावे, असे आवाहन केले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचे शाल, फूल देऊन सत्कार केले. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सावनुरे यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. जनरल सचिव म्हणून अरुण राजाज्ञा, खजानिस सुहास नाईक, सहायक खजानिस उत्तम शेंडगे, अभिलेख सचिव विकास मोघे, संघटन सचिव राजमाने यांची बिनविरोध निवड झाली. जयंत आपटे यांनी आभार मानले.
...
लोकराज्य जनता पार्टीचा संवाद मेळावा
कोल्हापूर : लोकराज्य जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शाहू स्मारक भवनमध्ये झाला. कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्याबरोबर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला. राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षस्थानी, जिल्हाध्यक्ष पी. के. पाटील प्रमुख उपस्थित होते. महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला झेंडे, प्रदेश संघटक विलास चव्हाण, शहराध्यक्ष विजय केसरकर, अमोल कांबळे, राहुल धुळे यांची भाषणे झाली. महेश कांजर, शाहीन बारगीर यांच्यासह कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले. सर्जेराव भोसले, शशिकांत जाधव, अशोक तोरसे, सुधाकर डोणोलीकर, आनंदा चव्हाण, कृष्णात सातपुते, अनिल वरेकर, नारायण लोहार, प्रमोद पाटील, प्रमोद जाधव, संदेश उपाध्ये उपस्थित होते. सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बिसुरे यांनी आभार मानले.