शिवसेना आंदोलन

शिवसेना आंदोलन

92675

शिवसेना महिला आघाडीचा मनपावर मोर्चा
पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ३१ ः शहरातील काही भागात दुषीत पाणीपुरवठा होतो, काही भागात अपुर होतो तर काही भागात २४ तासात पाणी. पाणी पुरवठा विभागाने हा सावळा गोंधळ थांबवावा, शहरात स्वच्छ व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला शिवसेना महिला आघाडी तोंडाला काळे फासेल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी दिला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी नागरिकांकडून नगरसेवकांना दोष देण्यात येतो. विनाकरण नगरसेवकांची बदनामी होते. याविषयी जाब विचारण्यासाठी शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
रवीकिरण इंगवले, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, सुनील मोदी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. इंगवले म्हणाले, ‘महापालिका अधिकारी बेजबाबदारपणे बोलतात, महापालिकेत सद्या कोणीही नगरसेवक नाहीत. प्रशासनाकडून कारभार चालवला जात आहे. पाणी पुरवठ्याचे प्रशासनाला काही कळत नाही. शहरातील पाणी पुरवठा नियोजनात तातडीने सुधारणा करावी,
प्रज्ञा उत्तुरे म्हणाल्या, ‘अनेकदा विद्युत मोटर बंद पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. नवीन मोटर्स बसवल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. दुरूस्तीचा खर्चाचा भारही कमी होईल.’
महापालिका जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी निवेदन स्वीकारले. बहुजन परिवर्तन आघाडीचे बाजीराव नाईक, शिवसेना शहर उपाध्यक्ष शशी बिडकर, विशाल देवकुळे, महिला संघटक स्मिता सावंत आदी उपस्थित होते.

चौकट
कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावरच पोलिसांनी रोखले
मोर्चा येताच महापालिका प्रवेशद्वारावरच पोलिसांनी बंद केले. त्यामुळे फाटकातून आत जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी ढकला ढकाली केली. पण, पोलिसांनी सर्वांना रोखले. आंदोलकांनी महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या मारला, जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणादूण सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com