डॉ. शिवाजीराव कदम यांना  ‘रा. कृ. कणबरकर पुरस्कार’

डॉ. शिवाजीराव कदम यांना ‘रा. कृ. कणबरकर पुरस्कार’

92740
...........

डॉ. शिवाजीराव कदम यांना
‘रा. कृ. कणबरकर पुरस्कार’

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी होणार वितरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३१ ः भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या प्राचार्य रा. कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. रोख १ लाख ५१ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
यंदा पुरस्काराचे सहावे वर्ष आहे. माजी कुलगुरू डॉ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून विद्यापीठाच्या वतीने या पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. पुरस्कार शोध समितीने कुलपती डॉ. कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य, योगदानाची दखल घेवून त्यांची एकमताने यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली. शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, संशोधक अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे १७५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. युजीसी, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून त्यांचे नामनिर्देशन झाले होते. नॅकचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी ते कार्यरत असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com