१

दिवसभरात २४७ उमेदवारी अर्ज दाखल

शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज दिवसभरात २४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्व साधारण गटातून ११६, इतर मागास प्रवर्गातून मधून ३८, महिला प्रवर्गातून १७ अर्ज दाखल झाले. अजूनही येत्या ३ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानुसार आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे. जवळपास ८९७ अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी ३८७ अर्ज दाखल झाले आहेत.
.....
.....

कार्यालय गर्दीने गजबजले

जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीत सुरू केलेल्या निवडणूक प्रक्रिया कार्यालयात आज काँग्रेस उमेदवारांनी तसेच अन्य व्यक्तिगत अर्ज भरणाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह येऊन अर्ज भरले. त्यामुळे हे कार्यालय दिवसभर गर्दीने गजबजून गेले. बाजार समिती निवडणुकीच्या इतिहासात यंदा विक्रमी संख्येने महिला प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com