Sun, June 4, 2023

कोरीवडे येथील आगीत
काजू, मेसकाठीचे नुकसान
कोरीवडे येथील आगीत काजू, मेसकाठीचे नुकसान
Published on : 1 April 2023, 12:45 pm
कोरिवडे येथील आगीत
काजू, मेसकाठीचे नुकसान
आजरा : कोरिवडे (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत चाळीस पंचेचाळीस एकराचा परिसर जळून गेला. यामध्ये काजू, आंबा व मेसकाठी यांचे नुकसान झाले आहे. जंगलातून वनवा आल्यावर वाळलेला पालापाचोळा, गवत यामुळे आग पसरत गेली. उन्हाचाही तडाखा मोठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. यामध्ये धोंडिबा पाटील, दौलती पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी पाटील, गोविंद पाटील, विलास पाटील, संभाजी पाटील, महादेव मिसाळे, गोविंद रामू पाटील, गोविंद तुकाराम पाटील, आनंदराव पाटील, शामराव पाटील, अर्जुन पाटील, राजाराम पाटील, मारुती पाटील, शिवाजी पाटील या शेतकऱ्यांच्या काजूची झाडे जळाली आहेत. मेसकाठीचेही आगीत नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांचे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.