अंबाबाई मंदिर आरोग्य केंद्र

अंबाबाई मंदिर आरोग्य केंद्र

अंबाबाई मंदिर परिसरातच
भाविकांसाठी आरोग्य केंद्राला प्राधान्य

रथोत्सवाची तयारी गतीनेः स्वच्छतागृहांच्या कामाला लवकरच प्रारंभ


कोल्हापूर, ता. १ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दीच्या वेळी आकस्मिक भाविकांना आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास उपचारासाठी मंदिर परिसरातच आरोग्य केंद्र उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जागा निश्चित करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, जोतिबा यात्रेनंतर यंदा श्री अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्याच्या तयारीला वेग आला आहे.
देवस्थान समितीच्या वतीने कोरोनापूर्वी मंदिर परिसरात आरोग्य केंद्राची सुविधा होती. मात्र, त्यानंतरच्या काळात आरोग्य केंद्र बंद करून तेथे तुला उभारली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी भाविकांकडून मागणी होत आहे. परवा मंदिरात एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर पुन्हा याबाबतच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात जागा निश्चित करून तेथे आरोग्य केंद्र लवकरच सुरू केले जाईल, असे समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी सांगितले.
...

रथाची आज चाचणी
श्री अंबाबाईचा रथोत्सव चार दिवसांवर आला आहे. समितीने यंदा तयार केलेल्या लाकडी रथाची पाहणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून उद्या (रविवारी) रथाची चाचणी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रथावरील चांदीच्या पत्र्यांचे नक्षीकामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा देवस्थान समितीचा प्रयत्न आहे.
...

पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृहे

मंदिर परिसरात भाविकांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. याबाबतची मागणी वारंवार होवू लागल्यानंतर भवानी मंडपातील पागा बिल्डींगमध्ये काही स्वच्छतागृहांची उपलब्धता केली आहे. मात्र, महिला व पुरूष भाविकांसाठी आणखी सुसज्ज स्वच्छतागृहांची गरज असून हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. येत्या आठ दिवसांत या कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com