Thur, June 1, 2023

कालीचरण महाराज
कालीचरण महाराज
Published on : 1 April 2023, 7:16 am
४०४२०
...
कालीचरण महाराजांनी घेतले
श्री अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर ः ‘ नथुराम गोडसे नसते तर भारताचा नाश झाला असता,’ असे वादग्रस्त वक्तव्य आज कालीचरण महाराज यांनी येथे केले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘हिंदू आता शेळपट राहिलेला नाही. सर्व प्रकारचे वाद विसरून तो एकत्र आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर जितक्या दंगली झाल्या त्या पूर्वनियोजित होत्या.’ ‘कोल्हापुरात बाहेरून येणारे लोक पहिल्यांदा आदीशक्ती अंबाबाईचे दर्शन घेतात. त्याचसाठी आम्ही आलेलो आहोत आणि सर्व देशावर तिची कृपा राहो’, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.