ईपीएस पेन्शनरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

ईपीएस पेन्शनरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

94069

ईपीएस पेन्शनरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी
प्रयत्नशील : मंत्री चंद्रकांत पाटील

ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे निवेदन

कोल्हापूर, ता. ६ ः साडेसात हजार रुपये मासिक पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा. पेन्शनर कुटुंबास मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात. योजनेतील वंचितांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी, या प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासदांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. त्यावर ईपीएस पेन्शनरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रसरकार, पंतप्रधान, विविध मंत्री, खासदार यांना निवेदने दिली आहेत. मात्र, आश्‍वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. त्यामुळे पेन्शनधारकांना वृद्धापकाळातही आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करावा लागत आहे. प्रलंबित मागण्यांची पूर्तता, प्रश्‍नांची सोडवणूक लवकर करावी, अशी संघर्ष समितीने मंत्री पाटील यांच्याकडे केली. समितीचे जिल्हाध्यक्ष बी. एस. किल्लेदार, शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड, एन. एस. पाटील, आर. डी. पाटील, चंद्रकांत ऐनापुरे, प्रकाश भोसले, सुरेश जाधव, उमेश कसबेकर, अमर पाटील, राजू परांडेकर, धैर्यशील घोरपडे, एच. एन. पाटील, दत्तात्रय घोरपडे, पंडित पाटील, आनंदा हिर्डेकर, जी. आर. पाटील, रामभाऊ गुजर, उदय शिंदे, दिलीप पाटील, बी. आर. यादव, सुभाष चौगुले, डी. के. घाटगे, श्री. कोपर्डेकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com