रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचा कायापालट करणार ः आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचा कायापालट करणार ः आवाडे
रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचा कायापालट करणार ः आवाडे

रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचा कायापालट करणार ः आवाडे

sakal_logo
By

ich84.jpg
94519
इचलकरंजी ः गुरुवर्य रविंद्रनाथ टोगार वाचनालयास भेट देवून आमदार प्रकाश आवाडे यांनी पाहणी केली.

रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचा
कायापालट करणार ः आवाडे

इचलकरंजी, ता. ९ ः महापालिकेचे गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर वाचनालय हे डिजीटल वाचनालय करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांपासून गरजू विद्यार्थ्याला येथे हवे ते मिळेल आणि त्यातून उच्चपदस्थ अधिकारी निर्माण होतील. त्यादृष्टीनेच या वाचनालयाचा कायापालट केला जाईल, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने टागोर वाचनालयासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये वाचनालयाच्या दुसऱ्‍या मजल्यावर सर्व आधुनिक सुविधानियुक्त अशी अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. निधीसाठी आमदार आवाडे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी टागोर वाचनालयास भेट देऊन तेथील विद्यार्थी-विद्यार्थीनींशी सुसंवाद साधला. तसेच त्यांना आवश्यक सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, प्रा. शेखर शहा, राजेंद्र बचाटे, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, राहुल घाट, सुभाष जाधव यांच्यासह ग्रंथपाल बेबी नदाफ आदी उपस्थित होते.