प्रार्थनेने इस्टर संडे साजरा

प्रार्थनेने इस्टर संडे साजरा

94644
गडहिंग्लज : इस्टर संडेनिमित्त येशूंच्या जन्माचा प्रसंग चर्चमध्ये साकारण्यात आला आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

ईस्टर संडेनिमित्त विश्‍वकल्याणाची प्रार्थना
पवित्र सप्ताहाची सांगता; चर्च परिसरात शांतता फेरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : गेल्या रविवारपासून (ता. २) सुरू असणाऱ्या ख्रिचन धर्मियांच्या पवित्र सप्ताहाची आज सांगता झाली. ईस्टर संडेनिमित्त सकाळी येथील कडगाव मार्गावरील संत एन्थोनी चर्चमध्ये प्रार्थना झाली. या वेळी चर्च भोवती शांतता फेरीही काढण्यात आली. विश्‍वकल्याणासह शांतता, समुध्दीसाठी प्रभु येशूंना साकडे घालण्यात आले. प्रभु येशूंच्या पुर्नजन्मानिमित्त आनंद साजरा करण्यात आला.
गेल्या रविवारपासून पाम संडेने पवित्र सप्ताहाची सुरवात झाली होती. हे प्रभु येशु, तु आमचे रक्षण कर असे म्हणत पाम संडे (झावळ्यांचा रविवार) साजरा केला. यानिमित्त प्रार्थना करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता पवित्र प्रार्थना झाली. या वेळी प्रभु येशून आपल्या भक्तांच्या पाय धुवून पूजन केले होते. त्याच धर्तीवर प्रतिकात्मक बारा भक्तांचे पुजन येथील चर्चमध्ये झाले. शुक्रवारी गुडफ्रायडेला सकाळी नऊ वाजता चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे झाली. दुपारी बारा वाजता चर्च ते आजरा रोड या मार्गावर क्रुसवात काढली. क्रुस घेऊन तालुक्यातील ख्रिचन बांधव यात सहभागी झाले होते.
शनिवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजता प्रार्थना झाली. त्यानंतर दुपारपर्यंत इस्टर व्हिजिन झाले. आज ईस्टर संडेने या पवित्र सप्ताहाची सांगता झाली. सकाळी आठ वाजता चर्चमध्ये प्रार्थना झाली. यावेळी इस्टर संडेचे महत्व सांगणारे प्रवचन झाले. चर्च परिसरात शांतता फेरी काढण्यात आली. यात ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. गूडफ्रायडेला सुळावर चढविण्यात आलेले प्रभू येशू तीन दिवसानंतर आज पुन्हा प्रकट होतात. त्यांच्या आगमनाचे आनंदाने स्वागत करण्यात आले. फादर ज्यो मंतेरो आणि सहकाऱ्यांनी याचे नियोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com