लिंगनूरला आज कुस्ती मैदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगनूरला आज कुस्ती मैदान
लिंगनूरला आज कुस्ती मैदान

लिंगनूरला आज कुस्ती मैदान

sakal_logo
By

लिंगनूरला आज
कुस्ती मैदान
गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे श्री बसवेश्वर यात्रेनिमित्त उद्या (ता. ११) निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. दुपारी चारला हे मैदान होईल. श्रीमंत भोसले (इचलकरंजी) व लिंगराज होनमाने (कोल्हापूर) यांच्यात पहिल्या क्रमांकाची २१ हजारांची कुस्ती होणार आहे. शशिकांत बोंगार्डे (कोल्हापूर) व कीर्तिकुमार बेणके (बेळगाव) यांच्यात २० हजार रुपयांची दुसऱ्या क्रमांकाची, ऋषिकेश पाटील (कोल्हापूर) व प्रकाश पाटील यांच्यात १५ हजार रुपयांची तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती होईल. मैदानात एकूण एक लाख चार हजार रुपयांच्या २० कुस्त्या होणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील व अजित केसरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शंकर कुरळे, रवींद्र डोंगरे, शंकर घुगरे यांनी केले आहे.