जरळीत हरिनाम सप्ताह सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरळीत हरिनाम सप्ताह सुरू
जरळीत हरिनाम सप्ताह सुरू

जरळीत हरिनाम सप्ताह सुरू

sakal_logo
By

gad1110.jpg
95144
जरळी : हरिनाम सप्ताहानिमित्त श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
--------------------------------------------------
जरळीत हरिनाम सप्ताह सुरू
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे हरिनाम सप्ताह व श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. पंढरपूरचे एकनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. येथील हरिनाम सप्ताहाला १२६ वर्षाची परंपरा आहे. विठ्ठल मंदिरात सप्ताह सुरू आहे. अनिल कुलकर्णी यांच्या घरापासून मंदिरापर्यंत विठ्ठल रखुमाई मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली. सरपंच सागर पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. रोज पहाटे काकड आरती, सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ त्यानंतर आठ ते दहा एकनाथ महाराज पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. १७ एप्रिलला एकनाथ महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.