
पत्रके कॉमन कॉमन
मधुमेहाच्या निदानासाठी आजपासून तपासणी
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि असोसिएशन ऑफ डायबिटीस सेंटरतर्फे (अँडोर) मधुमेहाच्या निदानासाठी मोफत एचबीए १ ‘सी’ तपासणी शिबिर गुरुवारपासून (ता. १३) गुरूवारपर्यंत (ता. २०) सकाळी आठ ते ११ वेळेत होईल. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम बिनखांबी गणेश मंदिर येथे शिबीर होईल. शिबिर पूर्णपणे मोफत असून रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये, अॅडॉर समितीचे संयोजक अजय खतकर, मंगेश पाटगावकर, ज्ञानेश्वर गवळी यांनी पत्रकाद्वार केले आहे.
-------------
धमाल उन्हाळी शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि गायत्री अकॅडमी प्रस्तुत सुगम संस्था राजेंद्रनगरतर्फे इयत्ता तिसरी ते नववीच्या मुला-मुलींसाठी योगा, ध्यान, क्रिया कलाप, व्यक्तिमत्त्व विकास, चित्रकला, एका परकीय भाषेची ओळख, पर्वतारोहणाची ओळख, चरित्रकथन, लोकगीते, समाज सेवा, प्रकल्प भेट, आरती, प्रसाद आदी शिकण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे वैशिष्ठ म्हणजे, दुध प्रकल्प, ऑक्सिजन निर्मिती, गोबर गॅस निर्मिती व, किल्ल्याचा भेटचा समावेश आहे. हे शिबिर बुधवारपासून (ता. १९) गुरुवारपर्यंत (ता. ४ मे) ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिर होईल. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी निलिमा कुलकर्णी, विद्या तगारे यांच्याशी संपर्क साधावा. केवळ प्रथम येणाऱ्या ७५ मुला-मुलींनाच प्रवेश मोफत मिळणार आहे, असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये, सुगम संस्थेच्या संयोजकांनी पत्रकाद्वार केले आहे.
------------------
95423 अनुप पाटील
95424 संग्रामसिंह निंबाळकर
संयुक्त राजारामपुरीच्या अध्यक्षपदी पाटील
कोल्हापूर : राजारामपुरी आणि परिसरातील सर्व तरूण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त नागरीक शिवजयंती निमित्ताने एकत्र येत आहेत. यासाठी २०१७ मध्ये संयुक्त राजारामपुरीची स्थापना केली. यावर्षीचा शिवजयंती महोत्सव साजरा करण्यासाठी ‘संयुक्त राजारामपुरी’ची संजय जाधव काका यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये २०२३-२४ करीता नवीन कार्यकारीणीची निवड झाली. यात अध्यक्षपदी अनुप पाटील, उपाध्यक्षपदी संग्रामसिंह निंबाळकर यांची निवड झाली. तसेच सचिव म्हणून विघ्नेश आरते, खजानिसपदी किशोर खानविलकर यांची निवड केली. सदस्य म्हणून अक्षय पाटील, ओंकार घाटगे, विजय कडवकर, धीरज रोडे, असिफ मुल्लाणी, पार्थ हजारे, राजदीप भोसले, संदीप पाटील, आदित्य चौगले, योगेश मोहिते, विशाल जाधव, हेरंब बडे, सनराज शिंदे, आदित्य भोसले यांचा समावेश आहे.
------------
शिंदे सरकार कॉलेजमध्ये ‘वाचन हितगुज’ कार्यक्रम
कोल्हापूर : डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये ग्रंथालय विभागातर्फे ‘वाचन हितगुज’ कार्यक्रम झाला. याअंतर्गत माजी प्राचार्य रा. तु. भगत यांनी महाविद्यालयास १३,००० रुपयांची पुस्तके भेट स्वरुपात दिली. वाचन संस्कृतीचे फायदे, वाचनाची सवय का जोपासली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. ग्रंथपाल स्वाती तोरस्कर यांनी संयोजन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी मनोगत व्यक्त केले.