
मुगळीत बांधकाम कामगारांना साहित्यासह ई-श्रम कार्ड वाटप
gad144.jpg
95775
मुगळी : बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप झाले. यावेळी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामी, सोमगोंडा आरबोळे, मल्लिकार्जुन आरबोळे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
मुगळीत बांधकाम कामगारांना
साहित्यासह ‘ई-श्रम’ कार्ड वाटप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे २०० बांधकाम कामगारांना सुरक्षा व जीवनावश्यक साहित्यासह ‘ई-श्रम’ कार्डचे वाटप नुल सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी व हिराशुगर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्याहस्ते केले.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी रात्री हा कार्यक्रम झाला. स्वामींनी आमदार पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. सोमगोंडा आरबोळे यांनी आमदार पाटील यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची धमक असल्याने सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले. अॅड. दिग्विजय कुराडे यांचेही भाषण झाले. सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. वसंत घोटणे यांनी आभार मानले. उपसरपंच संतोष भोसले, सदस्य चंद्रकांत माने, राम चौगुले, आप्पासाहेब माने, चंद्रकांत भोसले, गुरापा कांबळे, भीमा आरबोळे, सुनील वाघ, रामगोंडा पाटील, आप्पासाहेब पाटील, विक्रम शिंदे उपस्थित होते.