पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

शहरातून दोन दुचाकी चोरीस

कोल्हापूरः महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशदारालगत पार्किंगमधून एक आणि तपोवन मैदानावरील राजे संभाजी महानाट्याच्या पार्किंगमधून एक अशा दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. याची तक्रार हळदी (ता. करवीर) येथील फिर्यादी अक्षय राजाराम पाटील यांनी लक्ष्मीपुरीत दिली. तर हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील फिर्यादी गजानन रंगराव पोर्ले यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. मंगळवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. तर तपोवनमध्ये सुरु असलेले महानाट्य पाहण्यासाठी आलेले फिर्यादी पोर्ले यांची दुचाकी चोरट्याने गुरुवारी (ता. १३) सांयकाळी लंपास केली.
-------

विचारेमाळ परिसरात दुकानदारास मारहाण

कोल्हापूरः विचारेमाळ परिसरात दारू पिऊन किराणा दुकानदारास दगडाने मारल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. फिरोज जब्बार शेख (वय २४, रा. विचारेमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याची फिर्याद नंदकुमार जगताप यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जगताप यांचे विचारेमाळ येथे किराणा दुकान आहे. गुरुवारी (ता. १३) दुपारी फिरोजने घरात जावून जगताप यांच्या पत्नीला मारहाण केली. यावेळी फिर्यादी नंदकुमार व मुलगा रोहन या दोघांनी फिरोजला घराबाहेर काढले. त्यानंतरही फिरोज घराबाहेर उभा राहून ‘तुमचे घर पेटवून देतो, तुला जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत होता. याचवेळी त्याने दगड मारून जगताप यांना जखमी केले. फिर्यादीनुसार पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल केला.
--------------

साळोखेनगरात रोडरोलरच्या बॅटरीची चोरी

कोल्हापूरः साळोखेनगरात यशवंत लॉनसमोरील रस्त्याकडेला उभ्या केलेल्या रोडरोलरची ८ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरट्याने लंपास केली. याची फिर्याद हिंगणगाव (ता. हातकंणगले) येथील संजय आनंदा कोळी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. कोळी यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा रोडरोलर यशवंत लॉनसमोरील साळोखेनगरातील रस्त्याकडेला उभा केला होता. त्या रोडरोलरची बॅटरी बॉक्स कुलूप तोडून, वायर कापून आठ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरून नेली. याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com