Sun, Sept 24, 2023

अंबाबाई गर्दी
अंबाबाई गर्दी
Published on : 14 April 2023, 5:42 am
सलग सुट्यांमुळे
अंबाबाई मंदिरात गर्दी
कोल्हापूर, ता. १४ ः सलग सुट्यांमुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने दर्शन मंडपात फॅनची सुविधा उपलब्ध केली आहेत. मात्र, मंदिराच्या आवारात मुबलक पिण्याचे पाणी अजूनही उपलब्ध नाही.
महिन्यात सलग सुट्या अधिक आल्या असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे. आज आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुटी आणि पुढे शनिवार-रविवार अशा सलग सुट्या आल्याने पुन्हा गर्दी वाढली आहे. सकाळच्या सत्रात जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत दर्शन रांग जाते. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने दर्शन रांगेत फॅनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.