पती, पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पती, पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पती, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रकृती स्थिरः कौटुंबिक कारणातून कृत्य

कोल्हापूर, ता. १५ ः गोकुळ शिरगाव येथील पती आणि पत्नीने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. लग्नानंतर ते गोकुळ शिरगाव येथे राहू लागले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. आज सकाळी यातील पतीने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला. ते पाहून पत्नीने त्याला खाली उतरवले आणि नंतर स्वतः गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नातेवाईकांनी दोघांनाही सीपीआरमध्ये दाखल केले. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com