सावली केअर सेंटर

सावली केअर सेंटर

00567
सानेगुरुजी वसाहत : पीरवाडी (ता. करवीर) येथील सावली केअर सेंटरमध्ये आज दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व कॅलिपरचे वाटप करताना उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. शेजारी डॉ.किशोर देशपांडे, राजन जोग, विनय खटावकर, राजन देशपांडे.

‘सावली’मध्ये दिव्यांगांना
कृत्रिम अवयवांचे वाटप

कोल्हापूर, ता. १६ ः सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषदेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक मॉड्युलर पद्धतीच्या कृत्रिम हात, पाय व अन्य अवयव तसेच कॅलिपर वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील होते. त्याचा पहिला टप्पा म्हणून सावली केअर सेंटरच्या पीरवाडी येथील प्रांगणात या उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्‍या ‘शारीरिक मोजणीचा’ प्राथमिक कॅम्प मार्चमध्ये घेतला होता. या कॅम्पला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांबरोबरच कोकण, गोवा, बेळगाव, तसेच लातूर, बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यातूनही लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली. एकंदरीत ११७ दिव्यांग बंधूंची मापे या कॅम्पमध्ये घेतली. आज याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये या सर्व लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम झाला. ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले. हे अत्याधुनिक कृत्रिम अवयव, तसेच कॅलिपर्स सर्व लाभार्थ्यांना मोफत देण्यात आले.
प्रकाश मेहता, राजन देशपांडे, राहुल चिकोडे, विजय जाधव, सुहास काणे, शैलेंद्र मेहेंदळे, राहुल करमरकर, माणिकराव पाटील-चुयेकर, सुरेश खांडेकर, बाबूराव चौगुले, दिव्यांग आघाडीचे गजानन सुभेदार, डॉ. आनंद ढवळे, रामचंद्र टोपकर उपस्थित होते.
भारत विकास परिषदेच्या प्रांत अध्यक्षा प्रवीणा ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. किशोर देशपांडे यांनी ‘सावली’च्या अपंग क्षेत्रातील उपक्रमासंदर्भातील माहिती दिली. विकलांग पुनर्वसन केंद्राचे केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि त्यांच्या वापरासंदर्भातील माहिती दिली. ‘सावली’चे विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले. मंदार जोग यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com