राज्याची सहकार चळवळ देशभर

राज्याची सहकार चळवळ देशभर

gad169.jpg
96429
पुणे : रवळनाथच्या शाखा उद्‍घाटनप्रसंगी मंत्री बी. एल. वर्मा यांचा सत्कार एम. एल. चौगुले यांनी केला. ज्ञानेश्‍वर मुळे, अनिल कवडे, दिनेश ओऊळकर, व्ही. के. मायदेव, सुहास नाडगौडा उपस्थित होते.
----------------------------------------------
राज्याची सहकार चळवळ देशभर
केंद्रीय राज्यमंत्री वर्मा; रवळनाथ संस्थेच्या पुणे शाखेचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ : महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे केंद्र आहे. राज्यातील ही सहकार चळवळ देशभर व्यापली जावी, यासाठी नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. सामान्य माणूस, शेतकरी, नोकरदारांना केंद्रस्थानी ठेवून देशातील सहकार क्षेत्र काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी केले.
श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या अकरावी पुणे शाखा उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोथरूड शिवतीर्थनगरात कार्यक्रम झाला. मानवी हक्क आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, बाबासाहेब आजरी, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष वासुदेव मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मुळे म्हणाले, ‘महाराष्ट्राची भूमी सहकाराची गंगोत्री आहे. रवळनाथने अल्पावधीत गरुडझेप घेतली आहे. श्री. कवडे म्हणाले, सुलभ आणि चांगल्या पद्धतीने पतपुरवठा करण्याचे काम रवळनाथ करीत आहे. एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सुहास नाडगौडा यांनी स्वागत केले. डी. के. मायदेव यांनी आभार मानले. सीईओ डी. के. मायदेव, डॉ. प्रकाश हेरेकर, डॉ. के. एस. पाटील, विजय हरगुडे, पुष्पा नेसरीकर, जितेंद्र नाईक, नागाप्पा कोल्हापुरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com