२ दुचाकी चोरट्यांना अटक ८ मोटरसायकल जप्त

२ दुचाकी चोरट्यांना अटक ८ मोटरसायकल जप्त

96436
...

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापुरातील ८ दुचाकी जप्तः दोघेही चोरटे इस्लामपुरातील

कोल्हापूर, ता. १६ ः शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता.१३) इस्लामपुरातील दोन तरुणांना दुचाकी चोरीच्या संशयावरून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर शहरातून वारंवार दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या सर्व दुचाकींची किंमत ४ लाख रुपये इतकी आहे. अमर तुकाराम मंडले (वय २३), रमेश अनिल वडार (वय २१, रा. दोघे वडार गल्ली, उरण, इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील जयकुमार मोहन जाधव (वय ३३, रा.आशिर्वाद कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा) यांची दुचाकी ताराबाई पार्क येथील डी-मार्ट येथून चोरीस गेली होती. याबाबतची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला. दुचाकी चोरीला गेल्याची ठिकाणे, सराईत दुचाकी चोरटे यांची माहिती पोलिस घेत होते. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांना दोन दुचाकी चोरटे इस्लामपुरात असून त्यांनी कोल्हापुरातून दुचाकी चोरल्याची माहिती कळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथक तयार केले आणि इस्लामपुरात जाऊन दोघांचा शोध घेतला. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोन दुचाकी जप्त केल्या. त्यांना कोल्हापुरात आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी अमर याच्याकडून आणखी ६ दुचाकी जप्त केल्या. दोघांकडून एकूण ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, हेडकॉन्स्टेबल ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, सागर माने, लखन पाटील, शुभम संकपाळ यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com