पीएनजी बातमी जाहिरात विभाग

पीएनजी बातमी जाहिरात विभाग

96575
फोटो नं. सॅन पीएजनी नावाने

‘पीएनजी’तर्फे ‘रत्नावली’ दागिन्यांचे
कोल्हापूर, इचलकरंजीत प्रदर्शन

कोल्हापूर, ता. १७ : सांगलीतील प्रसिद्ध पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या कोल्हापूर आणि इचलकरंजी शाखेत ‘रत्नावली’ हे खास प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात खास हिरे, माणिक, पाचू आणि इतर रत्नजडित दागिन्यांचे नावीन्यपूर्ण व असंख्य डिझाईन्स उपलब्ध करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन आणि विक्री ‘पीएनजी’च्या कोल्हापूर व इचलकरंजी येथील शाखेत गुरुवारपर्यंत (ता. २०) सुरू असणार आहे.
सध्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच डायमंड ज्वेलरीची क्रेझही महिलावर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चोखंदळ ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन रत्नावली हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात दागिन्यांमध्ये हिऱ्याबरोबरच उच्च प्रतीचे पाचू आणि माणिक वापरले आहेत. पुष्कराज या रत्नाचे विविध प्रकार, तसेच नवरत्नांचे मोठे कलेक्शन ग्राहकांना आकर्षित करत आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच पीएनजीची ख्याती हिरे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठीही आहे. येथील प्रत्येक हिरा प्रमाणित असतो, त्यामुळे आपण निर्धास्तपणे पीएनजीमधून हिऱ्यांचे दागिने खरेदी करू शकतो. रत्नावली प्रदर्शन आणि विक्रीस ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन पीएनजीतर्फे करण्यात आले आहे.

मंगळसूत्र महोत्सव
सध्या सुरू असलेली लग्नसराई लक्षात घेऊन पीएनजीचा मंगळसूत्र महोत्सवही सुरू झाला आहे. मंगळसूत्राची उपलब्ध करण्यात आलेली अनोखी आणि वैविध्यपूर्ण विस्तृत रेंज या निमित्ताने ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. मंगळसूत्र महोत्सवाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मंगळसूत्राच्या मजुरीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. हा महोत्सव ३० एप्रिलपर्यंत पीएनजीच्या सर्व शाखांमध्ये सुरू असून. त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com