पानसरे खटला सुनावणी

पानसरे खटला सुनावणी

पानसरे खटला
सुनावणी २७ एप्रिलला

कोल्हापूर, ता. १७ ः आरोपींचे वकील अनुपस्थित असल्याने आज कामगार नेते गोविंद पानसरे खून खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. आता ही सुनावणी गुरुवारी (ता. २७) होणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजी राणे यांनी दिली.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे खटल्याच्या दोन सुनावण्या झाल्या आहेत. यामध्ये पंचांची साक्ष व उलट तपासणी झाली आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील काही आरोपींवर पानसरे खुनाचाही आरोप आहे. दाभोलकर खुन खटल्याची सुनावणी आज पुण्यात होती. आरोपींचे वकील पुण्यातील न्यायालयात असल्याने येथील सुनावणीस हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे ही सुनावणी गुरुवारी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com