Sun, October 1, 2023

आजरा तहसीलदारपदी समीर माने रुजू
आजरा तहसीलदारपदी समीर माने रुजू
Published on : 17 April 2023, 3:15 am
आजरा तहसीलदारपदी
समीर माने रुजू
आजरा ः आजरा तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर यांची नुकतीच माण (जि. सातारा) येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आजरा तालुक्याचे तहसीलदार म्हणून समीर प्रेमवीर माने रुजू झाले आहेत. मावळते तहसीलदार विकास अहिर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. तहसीलदार माने हे यापूर्वी करमाळा (जि. सोलापुर) येथे तहसिलदार होते. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसुल नायब तहसीलदार विकास कोलते, निवडणुक नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी अनंत चोले, धनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.