निकाल दिल्यानंतरच कार्यमुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकाल दिल्यानंतरच कार्यमुक्‍त
निकाल दिल्यानंतरच कार्यमुक्‍त

निकाल दिल्यानंतरच कार्यमुक्‍त

sakal_logo
By

निकाल दिल्यानंतरच
शिक्षक होणार कार्यमुक्‍त

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १७ : जिल्‍हा परिषदेच्या ४० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, जोपर्यंत शाळांचा निकाल तयार केला जात नाही, तोपर्यंत या शिक्षकांना कार्यमुक्‍त न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी शिक्षण विभागाला दिल्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याला पहिले प्राधान्य शिक्षकांनी द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्‍हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सुरू आहेत. या बदल्यात जिल्‍ह्यातून बाहेर बदली होणा‍ऱ्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जेवढे शिक्षक जिल्‍ह्याबाहेर जातील, तेवढेच शिक्षक येणे आवश्यक असल्याचे श्री. चव्‍हाण यांनी सांगितले.