जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

96797
शान - ए - खजाना फूड फेस्टिव्हल मधील काही व्यंजने.

रमजान निमित्त सयाजी हॉटेलमध्ये
शान-ए-खजाना फूड फेस्टिव्हल
कोल्हापूर, ता. १८ : रमजानचा महिना उपवासा बरोबरच अध्यात्मिक आनंदाचा आहे. या काळात आप्तस्वकीय व कुटुंबीयांबरोबर स्वदिष्ट् पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. यासाठीच सयाजी हॉटेलमध्ये १७ ते २३ एप्रिल दरम्यान शान ए खजाना या विशेष फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.  
या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील मुहम्मद अली रोड येथे असणाऱ्या निवडक खास पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी शेफ किशन गुंजाळ व त्यांच्या टीमने कोल्हापूरच्या खवय्यांसाठी निवडक विशेष व्यंजने तयार केली आहेत. सर्व डिशेस या परंपरागत पध्दत व साहित्य वापरुन तयार केलेले चवदार पदार्थ खवय्यांच्या पसंदीस उतरतील अशी आहेत. सोबतच काही सिग्नेचर डिशेस मिळणार असून यात नल्ली निहरी, मटन खिरी कबाब, खिमा पाव, पाया, हलीम अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे.  गोड्या पदार्थांमध्ये शाही तुकडा, मलाई खाजा, रबडीसह , मालपुआ व विविध स्वादातील कुल्फी यांचा समावेश आहे. विविध चवीच्या पदार्थांपासून ते मिठायांपर्यंत शान ए खजाना कडून प्रत्येकाच्या आवडीनुसार रमजानसाठी विशेष पदार्थ आपल्याला उपलब्ध होणार असल्याचे हॉटेलतर्फे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com