आजरा ः आजरा अर्बन बॅंक बातमी

आजरा ः आजरा अर्बन बॅंक बातमी

ajr181.txt
ajr181.jpg.....

96848
गारगोटी ः येथे आजरा अर्बन बॅंकेच्या शाखा नूतनीकरणाचे उद्घाटन अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अशोक चराटी, अध्यक्ष डाॅ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष रमेश कुरुणकर, संचालक व अन्य.
----------
आजरा अर्बनच्या गारगोटी
शाखेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन

आजरा, ता. १८ ः पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झाले. श्री. आबिटकर म्हणाले, ‘ग्रामीण भागात ५० वर्षापूर्वी गरज ओळखून बँकेने दुसरी शाखा गारगोटीत सुरू केली. आज बँकेने नूतनीकरण केले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.’ अध्यक्ष डाॅ. अनिल देशपांडे म्हणाले, ‘सेवा आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत बँकेने सर्वांचा विश्वास प्राप्त केला. आजरा बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सुरू केल्या.’ उपाध्यक्ष रमेश कुरुणकर म्हणाले, ‘कर्जासाठी कमीतकमी व्याजदर आकारून गरजूंना अर्थपुरवठा केला. भविष्यात ज्येष्ठ आणि दिव्यांगांना घरपोच बँकिंग सेवा दिली जाईल.’
अण्णा भाऊ संस्था समूहप्रमुख अशोक चराटी यांनी ग्रामीण भागात ज्याठिकाणी बँकिंग सेवा उपलब्ध नाही आणि आर्थिक व्यवहारात फसगत होऊ नये यासाठी बीसी, बीएफमार्फत बँकिंग सेवा देण्याचा मानस व्यक्त केला. जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल देसाई म्हणाले, ‘बँकेचा व्यवसाय १३२५ कोटीं झाला आहे. यापुढेही चांगले कामकाज बॅंक करेल.’ सभासद हिंदुराव देसाई म्हणाले, ‘आजरा बैंक परंपरा जपत व्यवसायवाढ करीत असल्यामुळे समाधान वाटते.’ ज्येष्ठ संचालक विलास नाईक व सुरेश डांग यांनी बँकेच्या कार्याचा आढावा मांडला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांचे भाषण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन, संचालक डॉ. दीपक सातोसकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com