स्‍थायी समितीत शिक्षक बदल्यांवर चर्चा

स्‍थायी समितीत शिक्षक बदल्यांवर चर्चा

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

स्‍थायी समितीत शिक्षक बदल्यांवर चर्चा
ुु
जुना ठराव रद्द करण्याचा प्रस्‍ताव


कोल्‍हापूर, ता.१८: जिल्‍हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चार वर्षांपूर्वी केलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचा विषय अजूनही गाजतच आहे. तत्‍कालीन सर्वसाधारण सभेच्या ठरावाचा आधार घेवून बदल्या झाल्याची तक्रार मलगोंडा पाटील यांनी केली होती. त्यानुसार शासनाने जिल्‍हा परिषदेकडे खुलासा मागवला होता. यावर, ज्या ठरावाचा आधार घेण्यात आला आहे, त्याचा उल्‍लेख शिक्षक बदल्यांच्या आदेशात कुठेच उल्‍लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सदरचा ठरावच रद्द करावा, असा प्रस्‍ताव आज झालेल्या स्‍थायी समिती सभेने केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या उपस्‍थितीत ही सभा पार पडली.

जिल्‍हा परिषदेच्या स्‍थायी समितीची सभेत आरोग्य, पशुसंवर्धनसह शिक्षण विभागातील विषयांवर चर्चा झाली. पशुसंवर्धन विभागाने औषध खरेदीबाबतचा प्रस्‍ताव सादर केला. तर आरोग्य विभागानेही काही विषयांना मान्यता घेतली. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागातील चार वर्षापूर्वींच्या बदल्यावर सविस्‍तर चर्चा झाली. सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून शिक्षण विभागाने बदल्या केल्याची तक्रार मलगोंडा पाटील यांनी केली होती. मात्र सर्वसाधारण सभेला शिक्षक बदलीबाबतचे अधिकार नसल्याचे शासनाच्या निदर्शणास आणून देण्यात आले. तसेच या चुकीच्या ठरावाच्या आधारे झालेल्या बदल्या रद्द करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती.

तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने जिल्‍हा परिषदेला दिले होते. मात्र शिक्षक बदलीचे अधिकार सभेला नसल्याने असा ठरावच रद्द करण्याचा प्रस्‍ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या ठरावाचा प्रत्यक्ष शिक्षक बदली आदेशात कुठेही उल्‍लेख नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com