बाजार समिती

बाजार समिती

वळंजू,अमित कांबळेंसह सहाजणांचा
निवडणूक लढवण्याचा मार्ग खुला

कोल्हापूर ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अवैध ठरलेल्या ८ माजी संचालकांचे अपील अर्ज जिल्हा सहकार उपनिबंधक निलकंट करे यांनी आज मंजूर केले, तर दोघांचे अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे नंदकुमार वळंजू व अमित कांबळे यांच्यासह सहाजणांना निवडणूक लढवण्याचा मार्ग खुला झाला आहे.
बाजार समितीत निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले. त्यावर छाननी होणार त्याचदिवशी बाजार समितीच्या प्रशासकांनी माजी संचालकांकडून बाजार समितीला दोन कोटी ७१ लाख ९५ हजारांची सामुदायिक व वैयक्तिकस्तरावर प्रत्येकी दीड लाख ते ६ लाखापर्यंतची येणे बाकी असलेल्या माजी संचालकांच्या नावांची यादी निवडणूक प्राधिकरणाला सादर केली होती. त्याची दखल घेत बारा संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक प्राधिकारणाने अवैध ठरवले होते. त्यानुसार बारा संचालकांपैकी दहा माजी संचालकांनी अर्ज अवैध ठरवल्याच्या मुद्द्यावर जिल्हा सहकार उपनिबंधकाकडे अपील केले होते.
याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेत जिल्हा उपनिबंधकांनी ८ जणांचे अर्ज अवैध ठरवले तर दोघांनी मुदतीत व योग्य त्या कागदपत्रानिशी अपील न केल्याचे कारण देत अर्ज फेटाळले आहेत. त्यानुसार यंदाच्या निवडणूक लढवण्यास नंदकुमार वळंजू ,अमित कांबळे, शशिकांत आडनाईक, संजय जाधव, नेताजी पाटील यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग खुला झाला. तर उत्तम धुमाळ व संगीत पाटील यांचे अपील फेटाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com