
''''इंगवले सर'''' फुटबॉल स्पर्धा
96899
कोल्हापूर : झुंझार क्लब आयोजित इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम अ विरुद्ध बीजीएम यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
लोगो - इंगवले सर फुटबॉल स्पर्धा
पीटीएम अ, प्रॅक्टिस क्लबचे विजय
एकतर्फी सामने; बीजीएम स्पोर्ट्स, कोल्हापूर पोलिसचे शुन्य गोल
कोल्हापूर, ता.१८ : झुंजार क्लब आयोजित इंगवले सर फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने बीजीएम स्पोर्ट्स संघावर ५ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघाने कोल्हापूर पोलिस संघावर ४ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियम वर स्पर्धा सुरु आहे.
पीटीएम अ विरुद्ध बीजीएम यांच्यातील सामना एकतर्फी झाला. सामन्याच्या ५ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर कैलास पाटील याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. या नंतर सोमाडी याने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात २ - ० अशी आघाडी मिळवून दिली. ‘बीजीएम’कडून झालेले प्रयत्न फोल ठरले. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला पीटीएम ‘अ’च्या आदित्य कल्लोळी याने गोल नोंदवून सामन्यात ३ - ० अशी आघाडी घेतली. पूर्वार्धाच्या अधिकच्या वेळेत सोमाडी याने वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथ्या गोलची नोंद करत ४ - ० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात पीटीएम ‘अ’ संघाने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. ४४ व्या मिनिटाला आदित्य कल्लोळी याने वयाक्तिक दुसरा, तर संघासाठी ५ वा गोल नोंदवून भक्कम आघाडी घेतली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत सामना एकतर्फी जिंकला.
‘प्रॅक्टिस’ क्लब विरुद्ध कोल्हापूर पोलिस संघातील सामना एकतर्फीच झाला. ‘प्रॅक्टिस’च्या राहुल पाटील याने ५ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात एक गोलने आघाडी घेतली. या नंतर सचिन गायकवाड याने ९ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना २ - ० असा केला. उत्तरार्धात सचिन गायकवाड याने ४३ व्या मिनिटाला वयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली. पाठोपाठ ४९ व्या मिनिटाला सागर पोवार याने ४९ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना ४ - ० केला. पोलिस संघाकडून झालेले प्रयत्न फोल ठरले.
सामनावीर
आदित्य कल्लोळी - पीटीएम - अ
सचिन गायकवाड - प्रॅक्टिस क्लब
लढवय्या
प्रथमेश साळोखे - कोल्हापूर पोलीस
संकेत जरग - बीजीएम
आजचे सामने
सकाळी ७ दिलबहार तालीम विरुद्ध सोल्जर ग्रुप
संध्याकाळी ४ खंडोबा तालीम विरुद्ध उत्तरेश्वर तालीम