Sat, Sept 23, 2023

स्वामीसमर्थ मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी
स्वामीसमर्थ मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी
Published on : 18 April 2023, 3:48 am
स्वामीसमर्थ मंदिरात
दिवसभर भाविकांची गर्दी
कोल्हापूर, ता. १८ ः अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आज येथील विविध स्वामीसमर्थ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. रूईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी, कोटीतीर्थ, जवाहरनगरातील स्वामी समर्थ समूह, संभाजीनगर मगरमठी, महाव्दार रोड आदी ठिकाणच्या मंदिरात दिवसभर गर्दी राहिली. काही मंदिरात नामजपासह आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. काही ठिकाणी प्रसादाचे वाटप झाले. सामूहिक आरतीलाही भाविकांनी मोठी गर्दी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर स्वामी समर्थांची शिकवण सांगणारी छायाचित्रे, व्हिडिओ शेअर झाले.