अग्निशमन दलातर्फे
शहरात प्रात्यक्षिके

अग्निशमन दलातर्फे शहरात प्रात्यक्षिके

अग्निशमन दलातर्फे
शहरात प्रात्यक्षिके
कोल्हापूर : आग लागल्यावर आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेचा वापर करण्याची प्रात्यक्षिके महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे दाखविण्यात आली. यात नागरिक सहभागी झाले होते. दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर यांनी माहिती दिली. १४ एप्रिलच्या अग्निशमन दल दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येत आहे. शहरात रोज विविध ठिकाणी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणे, हॉस्पिटल, मॉल आदींचा समावेश आहे. भवानी मंडपात नागरिकांना उपकरणांचीही माहिती देण्यात आली. दत्तात्रय जाधव, सुनील वाईंगडे, अभिजित सरनाईक, अजित शिनगारे, प्रभाकर खेबुडे, सौरभ पाटील, मेहबुब जमादार आदी सहभागी झाले होते
------------------
भटक्या कुत्र्यांप्रश्‍नी
मोर्चाचा इशारा
कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांवर नागरिक भुंकण्याचा मोर्चा काढतील, असा इशारा रायगड कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे. उपनगरांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भटकी कुत्री टोळक्याने धावून येत आहेत. अनेकांना ती चावली आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिक भुंकण्याचा मोर्चा काढतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com