सीमाभागातील महिला प्रवाशी

सीमाभागातील महिला प्रवाशी

97017

कोल्हापूर : सीमाभागातील महिलांना ५० टक्के सवलतीचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे अनघा बारटक्के यांना दिले.
-----

सीमाभागातील महिला प्रवाशांना
सवलत द्या ःशिवसेनेची मागणी

गडहिंग्लज : राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र कर्नाटक हद्दीसाठी पूर्वीप्रमाणेच तिकीटाची आकारणी केली जात आहे. यामुळे सीमाभागातील महिलांवर अन्याय होत असून अशा महिलांनाही तिकीटात सवलत देण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने (उद्धव ठाकरे गट) केली आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संतोष चिकोडे, संदीप कुराडे, सुशिल विभुते, अवधूत पाटील यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज ते कोल्हापूर विनाथांबा एसटीसाठी ९० रुपये तिकीट आहे. त्यात ५० टक्के सवलत म्हणजेच ४५ रुपये तिकीटाची आकारणी आवश्यक आहे. परंतु काळभैरी ते कोगनोळी नाक्यापर्यत कर्नाटकची हद्द असल्याने या अंतरासाठी पूर्वीप्रमाणेच तिकीटाची पूर्ण रक्कम आकारली जाते. यामुळे ७० रुपये द्यावे लागत असून केवळ २० रुपयांचीच सवलत मिळत आहे. कर्नाटकसह अन्य राज्यातून कराव्या लागणाऱ्या‍ प्रवासातही ५० टक्के सवलतीची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com