Thur, Sept 21, 2023

इचल :कारवाईची मागणी
इचल :कारवाईची मागणी
Published on : 19 April 2023, 7:03 am
सुरक्षा भारती; कारवाईची मागणी
इचलकरंजी, ता. १९ : आयजीएम रुग्णालयामध्ये तीन सुरक्षा रक्षकांची अनधिकृतपणे भरती केलेल्या संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कारवाई न झाल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनास जाब विचारण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली असुन त्यांचेकडुन याबाबतचा खुलासा अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी मनसेचे महेश शेंडे, अमित पाल, रवी गोंदकर, प्रतापराव पाटील, मनोहर जोशी उपस्थित होते.