
हस्ताक्षर शिबिराला प्रतिसाद
फोटो chd191.jpg
97062
मजरे कारवे ः हस्ताक्षर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य एम. एम. गावडे. शेजारी सदानंद पाटील, राजेंद्र शिवणगेकर आदी.
--------------------------------------
मजरे कारवेत हस्ताक्षर शिबिराला प्रतिसाद
चंदगड ः मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात झालेल्या हस्ताक्षर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिबिर झाले. संजय साबळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एम. एम. गावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते म्हणाले, ‘सुंदर हस्ताक्षर इतरांनाही भावते. एखाद्याच्या लिखाणाची पध्दत कशी आहे त्यावरुन त्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते. सातत्यपूर्ण सरावातून सुंदर अक्षर काढता येते.’ राजेंद्र शिवणगेकर, मनोहर नाईक, अविनाश दावणे यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुंदर पध्दतीने कसे काढायचे याविषयी मार्गदर्शन केले. ७७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना शिक्षक संघाच्या वतीने पेन भेट देण्यात आले. सदानंद पाटील, प्रा. पी. डी. गावडे, शाहू पाटील, महेश जांबोटकर, विजय मोरे, मनोहर बोकडे उपस्थित होते. बी. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एम. एन. शिवणगेकर यांनी आभार मानले.